अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरेंची पुढची भूमिका काय?; मनसे नेते म्हणाले...

Raj Thackeray ayodhya Visit Cancel : अयोध्या दौरा स्थगित झाल्याचं कळल्यानंतर हा दौरा नक्की का स्थगित झाला आणि हा दौरा पुन्हा कधी होणार याबाबत स्वतः राज ठाकरे बोलणार आहेत.
MNS Leaders Reaction On Raj Thackeray Ayodhya Visit postponed
MNS Leaders Reaction On Raj Thackeray Ayodhya Visit postponedSaam Tv

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या (Ayodhya) दौरा स्थगित झाला आहे. याबाबत राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत असताना मनसे (MNS) नेत्यांनीही हा दौरा रद्द झाल्याबाबात स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) शिवतीर्थ बंगल्यालवर आज सकाळपासून मनसेच्या महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. यात नुकताच जामीन मिळालेले संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी शिवतीर्थावर हजेरी लावली. तसेच नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनीही यावेळी शिवतीर्थावर हजेरी लावली होती. अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरेंची पुढची भूमिका काय? याचं उत्तरही रविवारी पुण्यात मनसेच्या मेळाव्यात मिळणार आहे. (MNS Leaders Reaction On Raj Thackeray Ayodhya Visit postponed)

हे देखील पाहा -

राज ठाकरे आमच्या मागे खंबीर पणे उभे राहिले : संदीप देशपांडे

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत संदीप देशपांडेंनी वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला हे स्वतः राज ठाकरे सांगतील. रविवारपर्यंत आपण वाट पाहावी आणि स्वतः राज ठाकरे त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतील असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. तसेच पोलीस दलातील एका महिला पोलीसाला धक्का देत खाली पाडल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मीडियाकडे जे फुटेज होते त्यावरून स्पष्ट झालं कि आम्हाला कसे अडकवले. असा कोणताही गुन्हा झाला नव्हता.

आम्ही सरकार विरोधात बोलतो, आमचं थोबाड बंद व्हावे यासाठी हे करण्यात आले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, कलम त्यांचे आहेत. जे कलम लावले आहेत ती घटना घडली होती का? तुम्ही सांगा माझा धक्का लागला होता का? असा प्रश्न त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाच विचारला होता. तसेच हे खरं असेल तर मी राजकारण सोडून देईन असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे राज ठाकरे आमच्या मागे खंबीर पणे उभे राहिले असंही देशपांडे म्हणाले.

पुण्यात सर्वांचा चोख हिशोब केला जाईल : कीर्तिकुमार शिंदे

राज ठाकरेच्या स्थगित झालेल्या दौऱ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे म्हणाले की, 'तूर्तास स्थगित'चा अर्थ 'पुढे होईल' असा आहे. जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? असं ते म्हणाले आहेत. तसेच मीडिया आणि विरोधकांनी 'तूर्तास स्थगित'चा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत! पुण्यात सर्वांचा चोख हिशोब केला जाईल असं ट्वीट करत त्यांनी सूचक इशारा दिला आहे.

राज ठाकरेंवर होणार शस्त्रक्रिया

प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या पायाला एक ते दीड वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. तेव्हापासून राज ठाकरे यांना हा त्रास जाणवत आहे. त्यामुळे पायाच्या दुखापतीमुळे राज ठाकरे यांनी हा दौरा तुर्तास स्थगित केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

पुण्याच्या मेळाव्यात देणार सर्व उत्तरं

अयोध्या दौरा स्थगित झाल्याचं कळल्यानंतर हा दौरा नक्की का स्थगित झाला आणि हा दौरा पुन्हा कधी होणार याबाबत स्वतः राज ठाकरे बोलणार आहेत. त्यांची उद्याची (२१ मे) पुण्यातलीही सभा रद्द झाली आहे. आता २२ मे ला रविवारी ते पुण्यात मेळावा घेणार आहेत. पुण्यातल्या गणेश कला क्रिडा केंद्र या सभागृहात सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे. याच मेळव्यात राज ठाकरे अयोध्या दौरा रद्द झाल्याचं नेमकं कारण राज ठाकरे सांगणार आहे. याबाबत "मनसैनिकांनो या! यावर सविस्तर बोलूच" असं ट्विट करत त्यांनी मनसैनिकांना मेळाव्यात येण्याचं आवाहन केल आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com