Raju Patil: कल्याणमधील खासदार डॉक्टर आहेत, मात्र...; महिला प्रसुती प्रकरणावरून राजू पाटील यांची नाव घेता श्रीकांत शिंदेंवर टीका

Raju Patil on shrikant shinde: महिला प्रसुती प्रकरणावरून राजू पाटील यांची नाव घेता श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे.
Raju Patil
Raju PatilSaam tv

अभिजीत देशमुख

Raju Patil On Shrikant Shinde:

‘कल्याणमधील रुक्मिणी रुग्णालयात घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. कल्याणमधील येथील खासदार डॉक्टर आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याची नस काय आहे. त्याची नस यांना सापडली नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली.

तसेच घटनेस जबाबदार असलेल्यांवर दोन दिवसात कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने जाब विचारणार, असा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

एका महिलेची प्रसूती करुन घेण्यास रुक्मीणीबाई रुग्णालयाने नकार दिल्याने त्या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या दारात झाली. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

Raju Patil
Kalyan News : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती; चौकशीला सुरवात, कारवाईचे दिले संकेत

संबंधितांवर कारवाई करण्याचे मागणी ठाकरे गटासह मनसे कडून केली जात आहे. महापालिकेने चौकशी देखील सुरु केली आहे. या घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाटील यांनी पालिका आयुक्तासह सत्ताधाऱ्यांना लक्ष करत इशारा दिला आहे.

रुक्मिणी रुग्णालयात घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. सर्व अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. स्वतःच्या नावापुढे डॉक्टर असलेले आयुक्त आहेत, इथले खासदार डॉक्टर आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याची नस काय आहे, त्याची नस यांना सापडली नाही, अशी टीका केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.

Raju Patil
Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक

याबाबत बोलताना घटनेस जबाबदार असलेल्यांना निलंबित करतील किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, येत्या दोन दिवसात कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने जाब विचारणार असा इशारा दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com