शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली; मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे आमदार यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला ट्विटरवरून टोला सुद्धा हाणला आहे.
raju patil.
raju patil.SaamTvNews

डोंबिवली - भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. काही अपक्षासोबत मनसेच एकमेव मत हे भाजप गेल्याचे यावरून दिसून आले आहे.दरम्यान विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे (MNS) आमदार यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला ट्विटरवरून टोला सुद्धा हाणला आहे. मनसे आमदार यांनी सांगितले की शिवसेना (Shivsena) लढाईतही हरली आणि तहात पण हरली आहे.

हे देखील पाहा -

मनसे आमदार यांनी ट्विट..

औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला.सेना लढाईतही हरली व तहात पण हरली. #राज्यसभानिवडणूक

दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.तर भाजपचे धनंजय महाडीक यांचा विजय झाला आहे.पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. हा महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे.तर काही अपक्षासोबत मनसेच एकमेव मत हे भाजप गेल्याचे यावरून दिसून आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com