२७ गावांमध्ये "सुविधा नाही, तर कर नाही"; मनसे KDMC विरोधात आंदोलन छेडणार

महापालिकेकडून फक्त कर वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
२७ गावांमध्ये "सुविधा नाही, तर कर नाही"; मनसे KDMC विरोधात आंदोलन छेडणार
MNS Raju Patil News, KDMC NewsSaamTvNews

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १८ गावांना महापालिकेकडून मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र कर वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्यापासून या गावांमध्ये सुविधा नाही तर कर नाही. हे आंदोलन सुरू करण्यात असल्याचा इशारा दिला. १८ गावांध्ये सुविधा नाही तर नाही या आशयाचे बॅनर लावून आपण स्वतः नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. (MNS Raju Patil Latest News)

MNS Raju Patil News, KDMC News
अविनाश भोसलेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या गावामध्ये मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

MNS Raju Patil News, KDMC News
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव; सोनिया गांधींनी आखला प्लॅन?

या गावांवर अन्याय होतो, पालिकेने या गावांकडे दुर्लक्ष केलं, कोरोना काळात या गावांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. मूलभूत सुविधा कडे दुर्लक्ष केलं जातंय, मात्र पालिकेची कर वसुली सुरू आहे . गावांना सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्त्यांची दुरवस्था व  पाणी टंचाई यामुळे नागरीक त्रस्त आहे .या पार्शवभूमीवर सुविधा नाही तर कर नाही हे आंदोलन घेण्यात येणार असून याबाबत मी स्वतः नागरिकांना कर न भरण्याबाबत आवाहन करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com