MLA Raju Patil : नशिबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका; मनसे आमदाराच्या निशाण्यावर शिंदे गट

Maharashtra Politics : आणि हो......ते श्रेय वगैरे जे आहे ना ते तुम्हीच घ्या !
 Raju Patil
Raju Patil saam tv

अभिजीत देशमुख

Dombivli News : डोंबिवली पूर्वेकडील लोढा पलावा सिटीला आयटीपी प्रोजेक्ट म्हणून ६६ टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील केली होती. मात्र याचे श्रेय मिळू नये म्हणून शिंदे गटातील एक मोठा लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणत असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे. (Latest Marathi News)

 Raju Patil
Indigo Filght : धक्कादायक! मद्यपीचा विमानात धिंगाणा, प्रताप असा की खावी लागली जेलची हवा

तसेच राजू पाटील (Raju Patil) यांनी नशीबाने तुम्हाला हत्ती दिले आहे व तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका. लोकहिताच्या निर्णयांना समर्थन द्या, कदाचित हीच पुण्याई भविष्यात तुम्हाला कामाला येईल आणि हो ते श्रेय वगैरे जे काही आहे ना ते तुम्हीच घ्या, आम्हाला त्याची गरज नाही असा टोला लगावला आहे. त्यामुळे हा शिंदे गटाचा नेता कोण या चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील पलावा सिटी अंतर्गत २५ हजार फ्लॅट धारकांना मालमत्ता कर न भरल्या प्रकरणी नोटीस पाठवल्या होत्या. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील लोढा पलावा सिटीला आय टी पी प्रोजेक्ट म्हणून मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी केली .याबाबत मनसे आमदार राजू पाटील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

 Raju Patil
Corona Cases in India: देशात कोरोनाचा धोका वाढला; 6 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद,14 जणांचा मृत्यू

याबाबत आता आमदार राजू पाटील यांनी खळबळजनक आरोप केलाय.मनसे आमदार पाटील.यांनी शिंदे गटाचा एक मोठा लोकप्रतिनिधी आयटीपी म्हणून पलावा सिटीला नियमानुसार जी ६६% सुट मिळावी म्हणून ती मिळविण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहे त्याचे श्रेय मिळू नये म्हणून पालिका आयुक्तांवर दबाव आणत असल्याचे मला काही पालिका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर निदर्शनास आणून दिल्याचा खळबळजनक आरोप केलाय.

इतकेच नव्हे तर हे जर खरे असेल तर मला 'त्या' लोकप्रतिनिधीला एवढेच सांगायचे आहे की नशीबाने तुम्हाला हत्ती दिले आहे व तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका. लोकहिताच्या निर्णयांना समर्थन द्या, कदाचित हीच पुण्याई भविष्यात तुम्हाला कामाला येईल. आणि हो ते श्रेय वगैरे जे काही आहे ना ते तुम्हीच घ्या, आम्हाला त्याची गरज नाही असा टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com