
अभिजीत देशमुख
डोंबिवली : पलावा येथील 25 हजार प्लॅट धारकांना मालमत्ता कर न भरल्याने केडीएमसी प्रशासनाने जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. ही नोटिस त्वरीत रद्द करुन आयटीपी योजने अंतर्गत मालमत्ता करात ६६ टक्के सूट देत नागरीकांना दिलासा द्या, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली.
या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी येत्या १५ दिवसात डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करत रिक्षा स्टॅन्डचे नियोजन करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
केडीएमसीने पलावा येथील कासा रिओ आणि कासा बेला या परिसरातील 25 हजार फ्लॅट धारकांना मालमत्ता कर न भरल्याने जप्तीची नोटिस पाठविली आहे. मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.
यावेळी आमदार पाटील यांनी ही नोटीस त्वरीत रद्द करण्यात यावी. या फ्लॅट धारकांना आयटीपी प्रकल्पांतर्गत मालमत्ता करात ६६ टक्के सवलत मिळावी यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे. ही मागणी केडीएमसीने मान्य करावी. नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली . या संदर्भात आयुक्तांनी सरात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
१५ दिवसात डोंबिवली स्टेशन परिसरात नियोजन करा अन्यथा आंदोलन
डोंबिवली (Dombivli) पूर्व स्टेशन परिसरीतील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात यावा तसेच स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे रिक्षा स्टँड चे नियोजन करत हा परिसर फेरीवाला आणि वाहतूक कोंडी मुक्त करावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र, आजा आयुक्तांनी यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पंधरा दिवसाकरीता हे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .
रेती उपसामुळे माणकोली पुलाला धोका होण्याची शक्यता
डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव व कोपर परिसरात होणार्या रेती उपशाबाबत आमदार राजू पाटील यांनी कोपर रेल्वे ट्रॅक परिसरात मोठय़ा प्रमाणात रेती उपसा केला जातो. त्यामुळे रेल्वे ट्रॅकला धोका निर्माण झाला आहे.
तसेच मोठा गाव माणकोली खाडी पूल परिसरात रेती उपसा सुरु आहे. त्यामुळे पूलाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. रेती उपसासाठी उपाययोजना केली पाहिजे. ज्यामुळे पुलाला आणि ट्रॅकला धोका होणार नाही. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर एक निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.