राजकारण बाजूला ठेऊन मृत्यु कारण तपासुन पाहूया; मनसे आमदाराचे नगरविकास मंत्र्यांना पत्र

पालकमंत्री म्हणून संबधित अधिकाऱ्याबरोबर तातडीची बैठक घेत तातडीने निर्णय घ्या आणि या गरिबांना न्याय द्या
राजकारण बाजूला ठेऊन मृत्यु कारण तपासुन पाहूया; मनसे आमदाराचे नगरविकास मंत्र्यांना  पत्र
Rajun PatilSaam Tv

मुंबई - डोंबिवली संदप गावातील खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटने नंतर या भागातील पाणी टंचाईची भीषणता समोर आली आहे. यानंतर या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांना भावनिक पत्र पाठवलं आहे. आमदार पाटील या भागातील रस्ते, पाणी, वाहतूककोंडी, कचरा व इतर समस्या मांडण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला मात्र यात नेहमीच राजकारण आडवे आले असून या दुर्दैवी घटनेनंतर तरी  राजकारण बाजूला ठेवून मृत्यूप्रकरण तपासून पाहूया. असे सांगत पालकमंत्री म्हणून संबधित अधिकाऱ्याबरोबर तातडीची बैठक घेत तातडीने निर्णय घ्या आणि या गरिबांना न्याय द्या  अशी  विनवणी मंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे .

हे देखील पाहा -

आमदार पाटील यांनी तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहीत नसेल म्हणून हा पत्रप्रपंच करत असल्याचे नमूद केलं आहे .आपल्या पत्रात पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळ या भागातील नागरिकांना सवयीचे होऊन गेल आहे. आता तर याच पाण्याने 5 निश्पापाचे बळी घेतले आहेत याची आठवण देत पालकमंत्री म्हणून वास्तवाकडे पाहण्याची विनती केली आहे. तर या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल या पत्रात केला आहे . त्यांनी पाण्यासाठी नागरिक उर बडवून मागणी करत असतानाही तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमले आहे.

Rajun Patil
औरंगाबादेत लेबर कॉलनीवर बुलडोझर; ३३८ घरांवर कारवाई

त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नसल्याचा आरोप केला आहे. अशी विचारणा करताना आमच्या जीवावर उठलेला आयुक्त आम्हाला नको अशी थेट मागणी केली आहे. तर या भागातील रस्ते,पाणी,वाहतूककोंडी,कचरा व इतर समस्या मांडण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला मात्र यात नेहमीच राजकारण आडवे आले असून या दुर्दैवी घटनेनंतर तरी राजकारण बाजूला ठेवून 'मृत्यूकारण' तपासून पाहूया. असे सांगत पालकमंत्री म्हणून संबधित अधिकाऱ्याबरोबर तातडीची बैठक घेत तातडीने निर्णय घ्या आणि या गरिबांना न्याय द्या अशी विनवणी केली आहे. पुढे त्यांनी लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही. कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार हे सांगायला देखील आमदार पाटील विसरलेले नाहीत. दरम्यान आमदार पाटील यांच्या भावनिक पत्रावर नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.