MNS News: कोकणवासीयांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा डल्ला; मनसे आमदारांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे धाव

कोकणवासीयांच्या मदतीला मनसे सरसावली
 Raju Patil
Raju Patil saam tv

अभिजीत देशमुख

Raju Patil News Today: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणवासी यांच्या पदरी निराशा पडली आहे .गणेशोत्सवापूर्वी दोन दिवसाचे म्हणजेच 17 सप्टेंबरचे आरक्षण खुले होतात अवघ्या तीन मिनिटात हे आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Latest Marathi News)

 Raju Patil
Beed News: घरात कोणी नसताना शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

दरम्यान कोकणवासीयांच्या मदतीला मनसे आमदार राजू पाटील (Raj Patil) सरसावले आहेत. ठाणे कल्याण पालघर पर्यंत कोकणवासी (Konkan) मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे.

यामुळेच या प्रवाशांना आरक्षण न मिळाल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पत्र लिहीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कोकणवासीयांसाठी नव्याने गाड्यांची सोय करत त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

 Raju Patil
Solapur BJP Leader joined Congress: सोलापुरात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने भाजपची सोडली साथ, काँग्रेसचा पकडला हात

याचवेळी रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार राज्या बाहेरून होत असून यात मोठ्या प्रमाणावर दलाल सक्रिय आहेत जे जनतेला वेठीस धरत आहेत. म्हणूनच असे दलाल नजरेस पडल्यास त्यांना मनसे स्टाईल दाखवणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

तर प्रवासी जनतेला आवाहन करताना त्यांनी अशा प्रकारे रेल्वेचा काळाबाजार करणारे दलाल नजरेस पडले तर आमच्या मनसे कार्यकर्त्यांसमोर त्यांना द्या मग त्यांना दलाली काय असते ते दाखवतो असा सज्जड दम देखील त्यांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com