Ulhasnagar MNS Protest against Potholes : उल्हासनगरात मनसेची ' सेल्फी ' विथ खड्डा स्पर्धा ', बक्षीस समारंभाला आयुक्तांनाही बोलावणार

Ulhasnagar Potholes Issue : उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून पाठवण्याचं आवाहन मनसेने नागरिकांना केलं आहे.
Ulhasnagar MNS Protest against Potholes : उल्हासनगरात मनसेची ' सेल्फी ' विथ खड्डा स्पर्धा ', बक्षीस समारंभाला आयुक्तांनाही बोलावणार

अभिजीत देशमुख

Ulhasnagar News : उल्हासनगरात सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे महापालिका लक्ष देत नसल्यामुळे मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी चक्क 'सेल्फी विथ खड्डा स्पर्धा' आयोजित केली आहे.

उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून पाठवण्याचं आवाहन मनसेने नागरिकांना केलं आहे. या खड्ड्यांच्या फोटोंचं प्रदर्शन मनसेकडून उल्हासनगर महापालिकेच्या बाहेर भरवलं जाणार आहे. तसेच यातील सर्वोत्कृष्ट तीन छायाचित्रांना पारितोषिकं देखील दिली जाणार आहेत.

Ulhasnagar MNS Protest against Potholes : उल्हासनगरात मनसेची ' सेल्फी ' विथ खड्डा स्पर्धा ', बक्षीस समारंभाला आयुक्तांनाही बोलावणार
Ulhasnagar Crime News: धक्का लागल्यामुळे टोळक्याकडून जबर मारहाण, उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

महापालिका आयुक्त प्रमुख पाहुणे

या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांनाही बोलवणार असल्याची माहिती मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी दिली आहे. उल्हासनगर शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आणि या खड्ड्यांचा त्रास वाहनचालक आणि नागरिक सहन करत आहेत. (Latest Marathi News)

Ulhasnagar MNS Protest against Potholes : उल्हासनगरात मनसेची ' सेल्फी ' विथ खड्डा स्पर्धा ', बक्षीस समारंभाला आयुक्तांनाही बोलावणार
Pune Crime News: पुणे स्टेशनवरुन मांजरीला जाण्यासाठी रिक्षा पकडली, पण चालकाने प्रवाशाला सासवडला नेऊन लुटले

विजेत्यांना बक्षिसही मिळणार

त्यामुळे मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी " सेल्फी विथ खड्डा" ही स्पर्धा आयोजित केले आहे, यामध्ये उत्कृष्ट पहिला खड्ड्यांसाठी २२२२ रुपये तर दुसऱ्या खड्ड्यांसाठी ११११ तर तिसऱ्या उत्कृष्ट खड्ड्यांसाठी ५५५ रुपयांची बक्षीस जाहीर केले असून मनसेच्या या भन्नाट आयडियाची सध्या उल्हासनगरात मोठी चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com