
सुशील थोरात
अहमदनगरमध्ये एसटी बसचा एक विचित्र अपघात समोर आला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसचं चाक निखळून पडल्याने अपघात झाला. या घटनेतून एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
पुण्याहून रावेरकडे ही बस निघाली असताना नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात ही घटना घडली. अपघात घडला त्यावेळी या बसमध्ये 55 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवत बस जागेवर थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. (Viral VIdeo)
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. मनसेने आपल्या अधिकृत X (जुनं ट्विटर) अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, 'नगरमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसचं चाक निखळलं, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.' (Latest Marathi News)
'७५ वर्ष जुनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी आचके का देत आहे? 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' म्हणत मिरवणारे 'त्रिकुट' काय करतंय? एसटीचंच नव्हे तर ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एक-एक चाक निखळतंय. परिवहन मंत्री महोदय वेळीच लक्ष द्या!', असं ट्वीट मनसेने केलं आहे.
एकीकडे राज्य सरकार एसटीची तिकिटं आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत असताना दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळातील बसगाड्यांची अवस्था बिकट असल्याचं वास्तव आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्विटद्वारे मांडलं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे तिकीट बुक करून एसटी महामंडळाच्या गळक्या बसमध्ये बसायचे का? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.