Sandeep Deshpande News : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मास्टरमाईंड कोण?
सुरज सावंत
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले असता, त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)
स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करणारे आरोपी हे भाडुंप पश्चिम येथील राहणारे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा हल्ला राज्यकीय वादातून करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एकाच नाव अशोक खारत तर दुसऱ्याच नाव सोलंकी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींकडून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मनसे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, हल्लेखोरांना देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला. दरम्यान, हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान, हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.