डोंबिवलीत पार पडला मनसे वाहतूक सेलचा संवाद मेळावा...

वेगवेगळ्या प्रकारची प्रवासी वा मालवाहू वाहने चालवून हातावर पोट भरणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंबिवलीत पार पडला मनसे वाहतूक सेलचा संवाद मेळावा...
डोंबिवलीत पार पडला मनसे वाहतूक सेलचा संवाद मेळावा...प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली - कोरोना Coroa महामारीमुळे सर्वसामान्यांच्या रोजगारावर गदा आली आहे.वेगवेगळ्या प्रकारची प्रवासी वा मालवाहू वाहने चालवून हातावर पोट भरणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हप्ते थकले म्हणून अर्थसंस्था भाडोत्री गुंडांमार्फत वाहनांची जप्ती करत आहेत, हा प्रकार बेकायदेशीर असून तो खपवून घेणार नाही,असा इशारा मनसेच्या वाहतूक सेलने डोंबिवलीतील मेळाव्यात बोलताना दिला.

मनसेच्या वाहतूक सेलच्यावतीने डोंबिवलीतील Dombivali स्वयंवर सभागृहात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मिळाव्यात वाहतूक सेलसह मनसे आणि इतर अंगीकृत सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष संजय नाईक, प्रदेश सरचिटणीस आरिफ शेख, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हा सचिव प्रकाश माने आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील पहा -

ज्यांनी कर्ज काढून वाहने घेतली आहेत, परंतु कोरोना महामारीत उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटामुळे कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत.थकीत हप्ते वसुलीसाठी विविध बँका भाडोत्री गुंडांमार्फत कर्जदारांची वाहने जबरदस्तीने उचलून नेत आहेत. जर असा प्रसंग डोंबिवलीतील कोणत्याही कर्जदारावर आला तर त्यांनी मनसेच्या कोणत्याही कार्यालयात किंवा शाखेत संपर्क साधावा, त्यांना पूर्णतः सहकार्य केले जाईल, असे आवाहन नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

डोंबिवलीत पार पडला मनसे वाहतूक सेलचा संवाद मेळावा...
लातुरात 228 पोलिसांना बढती प्राप्त

लवकरच डोंबिवलीमध्ये वाहतूक सेनेच्या अंतर्गत रिक्षा युनियनची स्थापना केली जाईल,असेही नाईक यांनी जाहीर केले. तसेच नागरिकांनी आपले वाहतूक सेनेचे सभासदत्व घेतल्यास त्यांना विविध प्रकारे होणारा फायदा व इतरही काही महत्त्वाच्या योजनांची माहिती उपस्थित पदाधिकाऱी आणि कार्यकर्त्यांना यावेळी दिली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com