मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय; मनसे पदाधिकाऱ्याची शिवसेनेवर टीका

मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय; मनसे पदाधिकाऱ्याची शिवसेनेवर टीका
MNS On ShivsenaSaam Tv

मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याविरोधात राज्य सरकारला इशारा दिला होता. ४ मेपर्यंत भोंगे उतरवले नाहीतर भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मनसेच्या आंदोलनानंतर ४ मेपासून राज्यातील मशिदींनी भोंगे बंद केले आहेत. पोलिसांनीही यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. शिंदे यांनी ही टीका ट्विटरवरुन केली.

'अनेक मशिदींचे मौलवी, असंख्य मुस्लिम बांधव समजूतदारपणा दाखवत भोंग्यांचा वापर थांबवत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कुणालाही अगदी युती/आघाडी सरकारलाही जे जमलं नाही, ते 'शिवधनुष्य' राजसाहेब ठाकरे यांनी यशस्वीपणे पेललं! मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय, असं ट्विट कीर्तिकुमार शिंदे यांनी केलं आहे.

MNS On Shivsena
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं उत्तर भारतीयांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. खास करुन मनसेने उत्तर प्रदेशातील लोकांचा विरोध केला होता. त्यावेळीपासून राज ठाकरे उत्तर भारतात चांगलेच चर्चेत होते. काही दिवसांपासून ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. यावरुनच बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

'राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा हात जोडून माफी मागितली पाहिजे. आता त्यांना अयोध्येची आठवण आली आहे. अयोध्येच्या आंदोलनात ठाकरे परिवाराचे काही देणघेणं नाही. त्यांनी माफी मागितल्याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी कोणताच संपर्क ठेवू नये, असंही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

Edited By - Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.