एकनाथ शिंदे सरकारला मनसेच्या वसंत मोरेंनी दिलं आव्हान, म्हणाले हिम्मत असेल तर...

महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा नवनिर्वाचित सरकारने लावला आहे.
MNS's Vasant More challenges Eknath Shinde
MNS's Vasant More challenges Eknath Shinde Saam TV

रश्मी पुराणिक -

पुणे : राज्यातील अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनेतर अखेर भाजप-शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आलं. अपेक्षेप्रमाणे नवं सरकार सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे.अशातच आता प्रभाग रचना, सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणारे निर्णय हे सरकार घेणार असल्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी ट्विटच्या माध्यमातून नव्या सरकारला आव्हान दिलं आहे. 'तुम्ही किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर (Pune) मनसेचाच असेल,' असं ट्विट मोरे केलं आहे.

वसंत मोरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'सरकार बदलले. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार, माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच (MNS) असेल.'

मोरे यांच्या ट्विटमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय नागरिकांमधून सरपंच निवडून देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, महाविकास आघाडी सत्तेवर येताच त्यांनी हा निर्णय बदलला होता. त्यामुळे आता पुन्हा सत्ता हाती येताच आपल्या जुन्या निर्णयांची अंमलबजावणी हे सरकार करणार असल्याचं दिसतं आहे.

सरकार येताच बदलला मेट्रोचा निर्णय -

राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच त्यांनी ठाकरे सरकारने घेतलेला मुंबईतील आरे कॉलनीतील (Aarey Colony) मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे बांधण्याचा निर्णय रद्द करत ते कारशेड आरे येथेच बांधण्याचा निर्णय कायम ठेवला.

याआधी ठाकरे सरकारने आरेमध्ये कारशेड (Metro Car Shed) बांधण्याचा फडणवीस यांचा निर्णय रद्द केला होता. मुंबईतील अनेक पर्यावरणवाद्यांनी आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध केला होता. कारशेडमुळे मुंबईतील मोठ्या हिरवळीचं नुकसान होईल, असा दावा करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आता हे सरकार सत्तेवर येताच त्यांनी ठाकरे सरकारचा निर्णय बदलला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com