मनसैनिक अयोध्येच्या वेशीवर; राज ठाकरेंचा अपुर्ण दौरा पूर्ण केल्याचा दावा

राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांचा हा दौरा आम्ही पूर्ण केला असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
MNSsainik at the gates of Ayodhya
MNSsainik at the gates of AyodhyaSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : मागील महिन्यामध्ये राजकीय क्षेत्रात चर्चेचा आणि वादग्रस्त ठरलेला मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा हा उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे स्थगित करण्यात आला होता.

शिवाय अयोध्या दौरा (Ayodhya) रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत आपण दौरा का रद्द केला याची कारण देखील सांगितली होती. तसंच राज यांनी दौरा करणार असल्याची घोषणा करुन दौरा रद्द केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी चांगलेच टीकास्त्र डागले होते.

मात्र, राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांचा हा दौरा आम्ही पुर्ण केला असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केला आहे. ते आज अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी आपल्या आपल्या फेसबुक अकाऊंटवरती अयोध्येतील एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

पाहा व्हिडीओ -

या व्हिडीओच्या खालील कॅपशन मध्ये त्यांनी लिहलं आहे, 'आजची तारीख ५ जून सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता, काही कारणास्तव तो रद्द झाला पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला मराठी माणसाचा स्वाभिमान जपला.' असं ते लिहंलं आहे. तसंच त्यांना प्रसारीत केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूंनी आणि भारतीयांनी करायला हवं, तसंच एक मराठी माणूस अयोध्येत आला असून त्याने राम लल्लाचं दर्शन घेतलं आहे.'

का करावा लागला दौरा रद्द ? -

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीही कडाडून विरोध केला. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता त्यांना मारहाण देखील केली होती. यासाठी राज यांनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी आणि जो पर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यामुळे राज यांना ५ जून चा नियोजित दौरा रद्द करावा लागला होता.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com