मोठी बातमी! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोडक-सागर धरण तुडूंब

मोडक-सागर धरण आज झालेल्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहू लागला आहे.
Modak Sagar Dam
Modak Sagar Dam saam tv

सुमित सावंत

मुंबई : महानगरपालिकेकडून दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (bmc water supply) नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर धरण हा आज झालेल्या मुसळधार पावसामुळं (heavy rainfall) ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मोडक सागर धरण (modak sagar dam overflow) तुडूंब भरुन वाहत असल्याची पावसाळ्यातील पहिलीच नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Modak Sagar Dam
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार स्वत: उतरणार मैदानात

मोडक-सागर धरण गेल्यावर्षी सन २०२१ मध्ये २२ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री ०३.२४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०२० मध्ये १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता तसेच २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. यापूर्वीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव याआधीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर)इतकी असून यामध्ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार ८११५२.२० कोटी लीटर (८,११,५२२ दशलक्ष लीटर)इतका म्हणजेच ५६.०७ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

Modak Sagar Dam
सामन्यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार : एकनाथ शिंदे

याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ४३.७२ टक्के अर्थात ९९२६.८० कोटी लीटर (९९,२६८ दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.७९ टक्के अर्थात ९६८९.४० कोटी लीटर (९६,८९४ दशलक्ष लीटर),‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ५३.९० टक्के अर्थात १०४३२.२० कोटी लीटर (१,०४,३२२ दशलक्ष लीटर) पाणी उपलब्ध आहे.

भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५१.०६ टक्के अर्थात ३६६११.३० कोटी लीटर (३,६६,११३ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५३.१८ टक्के अर्थात १४७३ कोटी लीटर (१४,७३० दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या ७६.०८ टक्के अर्थात ६१२.१० कोटी लीटर (६,१२१ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Edited By- Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com