गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आजपासून 'मोदी एक्स्प्रेस'

तर केंद्र सरकार सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाठी परवानगी द्यायला तयार आहे.
गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आजपासून 'मोदी एक्स्प्रेस'
गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आजपासून 'मोदी एक्स्प्रेस'SaamTV

मुंबई : आजपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस (Modi Express) रेल्वे सुरु करण्यात आली आहे त्या मोदी एक्सप्रेसला दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच रेल्वे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पहिलाच मुंबई दौरा होता या दौऱ्यादरम्यान दानवेंनी मुंबई मध्ये लोकलचा प्रवास केला. Modi Express starts from today towards Konkan

हे देखील पहा -

या लोकलच्या प्रवासादरम्यान (Local travel) दानवेंनी सामान्य प्रवाशांशी चर्चाही केली तसेच आजच्या या प्रवासाच कारण हे सामान्य प्रवाशांशी चर्चा करणं होतं आणि मी काही लोकांशी चर्चा केली. यावेळी प्रवाशांनी प्रवासा संदर्भात काही सूचना केल्या तसेच काही प्रवाशांनी निवेदन दिली आणि ती मी घेतली असून रेल्वेचा प्रवास अधीक सुरक्षित कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचही दानवे यावेळी म्हणाले.

गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आजपासून 'मोदी एक्स्प्रेस'
'...तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील'; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती! (पहा व्हिडीओ)

दरम्यान देशात 68 स्टेशन डेव्हलप करत आहोत यामध्ये गांधीनगर गुजरात , भोपाल हे दोन स्टेशन डेव्हलप केली आहेत तर आणखी काही स्टेशन ठाणे, नवी मुंबई, तसेच मुंबई सेंट्रल बस स्थानक डेव्हलपमेंट करणार असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली आहे.

तर सामन्यांचा रेल्वे प्रवास सुरु

राज्य सरकारने आम्हाला विनंती केलीतर केंद्र सरकार सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाठी परवानगी द्यायला तयार आहे. त्यामध्ये आम्हाला काही अडचण नसल्याचही दानवे म्हणाले.

प्रत्येक स्टेज वेगळा

प्रत्येक शाळेला वेगळा अनुभव असतो. प्रत्येक स्टेजचा वेगळा अनुभव असतो. एक काळ असा होता मी स्लीपर कोच मधून जायला लागलो ,मग एसी मध्ये बसलो, आता रेल्वेमंत्री झालो असल्याच विधान दानवेंनी पत्रकारांशी बोलताना केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com