"अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक" : सचिन सावंत

सर्वात मोठी थकबाकी ही महाराष्ट्राची आहे किंवा जेव्हा इतर राज्यांना थकबाकी दिली जाते तेव्हा महाराष्ट्र प्रतीक्षा करत असतो असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
"अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक" : सचिन सावंत
"अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक" : सचिन सावंतSaam TV

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय (RTI) अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार अनुदान सहाय्यतेत मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देत असल्याच्या आमच्या संशयाला पुष्टी मिळते आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटले आहे. ("Modi government treats Maharashtra like a stepmother in grant aid": Sachin Sawant)

हे देखील पहा -

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मोदी सरकारकडून महाराष्ट्राची मोठी रक्कम प्रतिपूर्तीसाठी सतत प्रलंबित ठेवली जाते. एप्रिल २०२० ते मार्च २१ आणि एप्रिल २१ ते जुलै २१ या कालावधीतील वस्तू व सेवा कराचा (GST) डेटा सांगतो की सर्वात मोठी थकबाकी ही महाराष्ट्राची आहे किंवा जेव्हा इतर राज्यांना थकबाकी दिली जाते तेव्हा महाराष्ट्र प्रतीक्षा करत असतो. सप्टेंबर अखेरपर्यंत २५ हजार ४८१ कोटी रुपये केंद्र सरकारकडे थकबाकी आहे. विशेष म्हणजे ही थकबाकी २०१९ पासून राहिलेली आहे. त्यातही १३ हजार ७८२.३० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे तर खात्यावर फक्त ११ हजार १११.१५ कोटी रुपये दिले आहेत.

"अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक" : सचिन सावंत
12 देशांतून आलेल्यांना 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक राहणार - टोपे

भारतीय जनता पक्षाचे (BJP) केंद्रातील सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करत असताना महाराष्ट्रद्रोही ढोंगी भाजपा मोदी सरकारकडे अधिक मदतीसाठी व थकबाकीची रक्कम वेळेत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारकडेच कर कमी करण्याची मागणी करत आहे, हे आश्चर्यकारक आहे, असेही सावंत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com