Panvel News : डीलिव्हरी बॉयकडून विनयभंग; तरुणीच्या छातीला हात लावून काढला पळ, आरोपी CCTVत कैद

Panvel Crime News : पनवेलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी डीलिव्हरी बॅायचा फोटो आता समोर आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Girl Molestation By Delivery Boy
Girl Molestation By Delivery BoySaam TV

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

पनवेल: नवी मुंबईतील पनवेलमध्ये (Panvel) एक संतापजनक घटना घडली आहे. एका नामांकित खाद्य कंपनीच्या फूड डीलेव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग (Molestation) केला आहे. जेवण पोहोचवण्यासाठी आलेल्या या डीलेव्हरी बॉयने तरुणीच्या वक्षस्थळाला हात लावून पळ काढला आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील कोन गावात काल, बुधवारी घडली होती. याप्रकरणी आता आरोपी असलेल्या डीलेव्हरी बॉयचा फोटो समोर आला आहे. (Panvel Crime News)

Girl Molestation By Delivery Boy
Video: नवी मुंबईत जुन्या वादातून एकाला जबर मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहीतीनुसार, घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या एका कंपनीच्या डीलेव्हरी बॉयने खाद्यपदार्थ घरपोच केल्यावर रक्कम स्वीकारली. यावेळी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केला. या डीलेव्हरी बॉयने तरुणीच्या वक्षस्थळाला हात लावला आणि तिथून पळ काढला. पनवेलमधील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. (Breaking Marathi News )

विनयभंग झालेली तरुणी ही शिक्षण घेत असून तरुणीने घडलेल्या प्रसंगाची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहम्मद रिजवान शेख असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून आता त्याचा फोटोही समोर आला आहे. या संतापजनक घटनेनंतर पोलीस आता या डीलेव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com