Ambernath : ऑफिसला जायला निघालेल्या तरुणीचा विनयभंग; विकृताला पोलिसांनी केली अटक

Ambarnath Crime News : अंबरनाथमधील शिवगंगानगर परिसरात आजवर अनेकदा महिला आणि तरुणींची छेड काढण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
Molestation of a young woman in Ambernath
Molestation of a young woman in AmbernathSaam Tv

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये (Ambarnath) ऑफिसला जायला निघालेल्या एका तरुणीचा विकृताने विनयभंग (Molestation) केल्याची घटना संतापजनक घडली आहे. या विकृताला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Molestation of a young woman on her way to the office in Ambernath; The pervert was arrested by the police)

हे देखील पाहा -

अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणारी एक तरुणी ही एका मोठ्या बँकेत वरिष्ठ पदावर काम करते. ही तरुणी आज सकाळी कामावर जायला निघाली असता अचानक एक विकृत तरुण तिथे आला आणि त्याने या तरुणीचा विनयभंग केला. या घटनेनंतर हा विकृत तिथून पळून गेला. मात्र पुन्हा ही तरुणी ऑफिसला जाण्यासाठी रिक्षेत बसल्यानंतर या तरुणीने त्याला पाहून स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडलं आणि थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं. वीरेंद्रकुमार भारती असं या २७ वर्षीय विकृताचं नाव असून तो बारकूपाडा झोपडपट्टीत राहणारा आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

Molestation of a young woman in Ambernath
Covid-19 : ठाणेकरांवर कोरोनाचे वाढते सावट; जिल्ह्यात आतापर्यंत ९९२ रुग्णाची नोंद

अंबरनाथमधील शिवगंगानगर परिसरात आजवर अनेकदा महिला आणि तरुणींची छेड काढण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com