मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; अनिल देशमुख यांच्या मुलाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

हृषीकेश देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
Hrishikesh Deshmukh
Hrishikesh DeshmukhSaam TV

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. तपास यंत्रणांनी समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.

ऋषिकेश देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याबाबत ईडीचे आरोप आहेत की, ऋषिकेश देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे कायदेशीर देणगी म्हणून दाखवले होते आणि वडील अनिल देशमुख यांचीही मदत घेतली होती. (Latest Marathi News)

Hrishikesh Deshmukh
Deepali Sayed : उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा, दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली इच्छा

ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती. ऋषिकेश तपासाला सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने केला आहे.

Hrishikesh Deshmukh
Pune : नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी सुप्रिया सुळेंनी टाकलं पाऊल; थेट जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसूलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रिय असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुख सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत.

अनिल देशमुख यांना या प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांना त्यानंतरही तुंरुगात रहावं लागत आहे. कारण ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com