Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यात ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update | भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: राज्यभरात येत्या ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात येत्या ४८ तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान (IMD) खात्याने दिला आहे. ५ ते ११ ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Weather Updates)

हे देखील पाहा -

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतही ७ आणि ८ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सुनचं पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात येत्या ४८ तासात नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता होणार आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com