पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली
पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी पात्रता पाण्याची पातळी वाढली असून चिंचवडचे ग्रामदैवत असणाऱ्या मोरया गोसावी गणपती मंदिर जलमय झाले आहे.

हे देखील पहा -

सध्या पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पवना धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे दोन वर्षानंतर पवना माई मोरया गणपती मंदिराला भेटायला आली नव्हती, मात्र या वर्षी पहिलाच पाऊस धमदार पडल्याने पवना माई मोरया गणपती मंदिरास भेटायला आली, हा एक शुभ संकेत असल्याचे मत मंदिरातील पूजाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com