Breaking : सहा वर्षांच्या मुलीसह आईनं संपवलं जीवन, माय-लेकीच्या आत्महत्येमुळं खळबळ

मीरा-भाईंदर येथे धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam Tv

मीरा भाईंदर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने तिच्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. टेरेसवरून उडी मारून माय-लेकीनं जीवन संपवलं. मृत पावलेल्या दोघी काशीमीरा पोलीस ठाणे (Kashimira Police Station) हद्दीतील गौरव गॅलक्सि नित्यानंद नगर, शांती गार्डन परिसरात राहत होत्या. याप्रकरणी काशीमीरा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. (Mother-daughter ends life jumping from terrace)

Mumbai Police
देवेंद्र फडणवीसांचे वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गॅलक्सी नित्यानंद नगर, शांती गार्डन परिसरात मध्ये राहणाऱ्या महिलेनं तिच्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे. या संदर्भात काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील तपास सुरू असल्याचे सांगितलं.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com