उल्हासनगर - पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या असल्याने उल्हासनगर पोलिसांनी याबाबत गुप्तबातमीदारांना जागृत केलं होतं. यावेळी एका गुप्त बातमीदाराने उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिलेल्या एका माहिती वरून, उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक परिसरात रात्री तीन वाजता सापळा लावून मोनू जयस्वार या युवकास मोटारसायकल सह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
हे देखील पहा -
या कामात त्याला त्याचा मित्र अमीन रुस्तम मन्सूरी हा सहकार्य करत असल्याची माहिती मनूने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी अमीनला देखील अटक केली. या दोन्ही चोरांकडून तीन मोटारसायकल दोन एक्टिव्हा आणि एक पल्सर गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.