नवी मुंबई: विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पुन्हा आंदोलन
Navi Mumbai International Airport NewsSaam TV

नवी मुंबई: विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पुन्हा आंदोलन

मोदी पुन्हा निवडुन येणार म्हणताच, काँग्रेस नेत्याने रागाने सोडले आसन, सर्वपक्षीय बैठकीत पक्षीय राजकारण.

डोंबिवली : लोकनेते स्व.दि.बा.पाटील (D.B.Patil) यांचे नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती बैठक पार पडली. यावेळी २४ जून रोजी पुन्हा मोठे आंदोलन केले जाईल असे सांगण्यात आलं आहे. मात्र, यावेळी भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी आपले मनोगत मांडताना २०२४ साली मोदी (Narendra Modi) पुन्हा निवडून येतील असं विधान केलं. (Navi Mumbai International Airport)

पाटील यांनी मोदींच्या विजयाचा उल्लेख करताच काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनी संताप वक्त करत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे बैठकीत एकच गोधळ उडाला,अखेर इतरांनी हस्तक्षेप केल्यावर केणे हे पुन्हा आपल्या जागेवर बसले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत पक्षीय भूमिका असल्याचं देखील समोर आलं आहे.

हे देखील पाहा -

डोंबिवली (Dombivli) येथील प्रगती महाविद्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी आयोजित केली होती. या बैठकीत भाजपा नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, मोदी सरकारच निवडून येणार असे विधान केल्यामुळे बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस प्रदेश नेते संतोष केणे यांचा पारा चढला आणि त्यांनी बैठक कसली आणि विधान कसली करता, असा प्रश्न उपस्थित केला आणि आपले आसन सोडले.

या सर्व प्रकारामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ सभेत गोंधळही निर्माण झाला. इतर नेत्यांनी केणे यांना शांत करून त्यांची मनधरणी करून पुन्हा आसनस्थ केलं.

दरम्यान, भाजप (BJP) नेते पाटील यांनी नंतर शांततेची भूमिका घेऊन या विषयावर पडदा टाकला. या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, संघर्ष समितीचे गुलाब वझे, १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील आणि भूमिपुत्र उपस्थित होते.

काय म्हणाले संतोष केणे?

केणे म्हणाले, 'आपण दि. बा. पाटील यांच्या स्मृती दिन बैठकीसाठी जमलो आहोत. बैठकीत सामाजिक आणि स्मृती दिन विषयावर चर्चा करण्याऐवजी पाटील यांनी राजकारण आणण्याची गरज नव्हती. शिवाय कोण निवडून येईल हे लोक ठरवतील असं केणे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com