खासदार नवनीत राणांना जेजे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

खासदार नवनीत रवी राणा यांना भायखळा जेल मधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
Navneet Rana Latest Marathi News, Navneet Rana admitted to JJ Hospital
Navneet Rana Latest Marathi News, Navneet Rana admitted to JJ Hospital Saam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. राणा यांच्या वकिलांनी त्यांना मणक्याचा त्रास असून त्यांच्या कमरेचे दुखणे वाढले असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. तसंच उपचारासाठी राणा यांना बाहेर नेण्याची परवानगी मिळावी यासाठी राणा यांच्या वकिलांनी भायखळा तुरुंग अधीक्षकांकडे मागणी केली होती. अखेर नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये (JJ Hospital) हलविण्यात आलं आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण करणारच असा इशारा देत अमरावतीमधून मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे मुंबईमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. शिवाय राणा यांच्या वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारी होती असं सांगत त्यांच्यावरती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली होती.

तसंच राणा दाम्पत्याला पोलिस ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी पोलिसांशी देखील हुज्जत घातल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

हे देखील पाहा -

दरम्यान, राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास देखील कोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात (Byculla Jail) तर आमदार रवी राणा तळोजा (Taloja Jail) कारागृहात आहेत. तर आता प्रकृतीच्या कारणास्तव नवनीत राणा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com