Navneet Rana News: नवनीत राणांना 'या' ६ अटींवर जामीन मंजूर

नवनीत राणा आणि रवी राणा यांना सत्र न्यायालयाने सहा अटींवर जामीन मंजूर केला आहे.
Navneet Rana News: नवनीत राणांना 'या' ६ अटींवर जामीन मंजूर
Navneet Rana and Ravi Rana latest News UpdateSAAM TV

मुंबई: हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. गेल्या अकरा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. अटी-शर्तींचे उल्लंघन झाले तर, जामीन रद्द होईल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, नवनीत आणि रवी राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले की, आज संध्याकाळपर्यंत राणा यांची जामीनावर सुटका होईल.

Navneet Rana and Ravi Rana latest News Update
Ravi-Navneet Rana : मुंबई सत्र न्यायालयाकडून रवी आणि नवनीत राणा यांना जामीन मंजूर | SAAM TV

राणा दाम्पत्याला कोणत्या अटींवर मिळाला जामीन

  • राणा दाम्पत्य या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब माध्यमांसमोर येऊन सांगू शकत नाही.

  • पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाहीत.

  • ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती, त्या प्रकारचा कोणताही गुन्हा ते पुन्हा करू शकत नाहीत.

  • राणा दाम्पत्याला चौकशीत सहकार्य करावे लागेल.

  • तपास अधिकारी (IO) चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा हजर व्हावे लागेल. त्यासाठी संबंधित तपास अधिकारी २४ तास आधीच नोटीस देतील.

  • ६. जामिनासाठी प्रत्येकी ५० हजारांचा बॉण्ड भरावा लागेल.

Navneet Rana and Ravi Rana latest News Update
खासदार नवनीत राणांना जेजे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

काय आहे प्रकरण?

राज्यात लाउडस्पीकरवरून वाद सुरू होता. त्याचवेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा (Ravi Rana) हे मुंबईत आले होते. यावरून शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यांनी मातोश्रीबाहेर कडा पहारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केली होती. तसेच पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

राणा दाम्पत्याच्या घराच्या दरवाजावर BMC ची नोटीस

राणा दाम्पत्याला आज काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून राणांना दिलासा मिळाला असला तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. मुंबई महापालिकेने सोमवारी राणा यांच्या खार येथील फ्लॅटबाहेर नोटीस लावली आहे. या नोटिशीनुसार, महापालिकेकडून फ्लॅटची पाहणी करण्यात येणार होती. फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचा संशय आहे. दरम्यान, खार येथील घरी महापालिकेचे पथक गेल्याचे सांगण्यात येते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.