खासदार नवनीत राणांनी कारागृहातून बाहेर येताच जोडले माध्यमांना हात, कारण...

बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत होते.
खासदार नवनीत राणांनी कारागृहातून बाहेर येताच जोडले माध्यमांना हात, कारण...
Ravi Rana- Navneet RanaSaam TV

मुंबई: हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यांची आज कारागृहातून सुटका झाली आहे.

प्रकृतीचा त्रास जाणवत असल्याने आता राणा थेट लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या आहेत. लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार वैद्यकीय तपासणी व पुढील उपचार घेणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी कारागृहातून बाहेर येताच माध्यमांना हात जोडले आहेत.(Navneet Rana)

आमदार रवी राणा यांचीही सुटका होणार आहे. त्यांचे वकील तळोजा कारागृहात दाखल झाले आहेत. रिलीज ऑर्डर आता तळोजा कारागृहातील टपाल बॉक्स मध्ये टाकण्यात येणार आहे. दुपारी ३.३० पर्यंत त्यांची होईल.

आदेशाची प्रत वेळेत पोहोचली नाही

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाच्या आदेशाची प्रत ५:३० वाजेपर्यंत जेलमध्ये आली नाही, त्यामुळे त्यांची आजची रात्रही जेलमध्ये जाणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता रवी राणा यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

सहा अटींवर जामीन मंजूर

  • राणा दाम्पत्य या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब माध्यमांसमोर येऊन सांगू शकत नाही.

  • पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाहीत.

  • ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती, त्या प्रकारचा कोणताही गुन्हा ते पुन्हा करू शकत नाहीत.

  • राणा दाम्पत्याला चौकशीत सहकार्य करावे लागेल.

  • तपास अधिकारी (IO) चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा हजर व्हावे लागेल. त्यासाठी संबंधित तपास अधिकारी २४ तास आधीच नोटीस देतील.

  • ६. जामिनासाठी प्रत्येकी ५० हजारांचा बॉण्ड भरावा लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.