MP Rahul Shewale: मला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचे पाकिस्तान, दाऊदशी संबंध; खासदार शेवाळेंचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

MP Rahul Shewale Press Conference: या संपूर्ण प्रकरणाचा NIAच्या माध्यमातून तपास करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी दिली आहे.
MP Rahul Shewale Press Conference
MP Rahul Shewale Press ConferenceSaam TV

संजय गडदे, मुंबई

MP Rahul Shewale News: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार राहुल शेवाळे एका महिलेसोबत दिसत आहे, यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. अशात खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टीकरण दिलं आहे. "माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत त्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावा शेवाळे यांनी केला आहे." या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे देखील उपस्थित होत्या. (Rahul Shewale press conference)

MP Rahul Shewale Press Conference
Mumbai Crime: लग्न ठरलं पण अल्पवयीन असल्यानं विवाहाला विलंब; मुलीनं घरातच घेतला गळफास

"माझं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केलेत, ती महिला पाकिस्तानी एजंटच्या मदतीने माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. या महिलेला युवासेनेचा पाठिंबा आहे. विशेष करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीच या महिलेला फूस आहे", असा गंभीर आरोप शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, ज्या महिलेने आरोप केले त्यांचे कुटुंब हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले कुटुंब आहे. महिलेला मदत करण्यासाठी मित्र रेहमान यांनी विनंती केली होती, मात्र त्यानंतर या महिलेची अपेक्षा वाढत गेली आणि मग ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. तिच्या भावाने दिल्लीत एक पुरुषाचा खून केला त्या महिलेसमोर पतीचा खून झाला यामागे मला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा हात आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचे पाकिस्तानी नागरिकांशी संबंध आणि दाऊशी संबंध असल्याचा गंभीर आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

पुढे ते म्हणाले, शारजा पोलिसांनी तिला अटक केली. फेक अकाउंटवरुन माझ्या पत्नीला धमकी देण्यात आली. युवासेनेचे पदाधिकारी त्या महिलेला माझ्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी प्रवृत्त करत होते. साकीनाका पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून मी न्यायालयात गेलो, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनिल परब यांनी मदत केली आणि पोलिसांनी तपास केला. माझ्या बदनामी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचाही हात आहे असं म्हणत खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल शेवाळे यांनी आरोप केले की, माझ्या पत्नीला वारांवार धमक्या आल्याने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मी शिवसेना सोडल्याने प्रकरणं तापवत माझ्याविरुद्ध अपप्रचार करण्यात येत आहे. काल मी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल माहिती मागितले तेव्हा हे प्रकरण अधिक तापलं. युवासेना प्रमुख यांच्यामुळे देखील हा विषय पुढे आला. हे कट कारस्थान युवासेना प्रमुख यांच्या मूळे हे प्रकरण तापवलं गेलं. माझं राजकीय आयुष्य संपवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. मला ब्लॅकमेल करणाऱ्या महीलचे पाकिस्तानच्या गॅंगसोबत संबंध आहेत असाही दावा त्यांनी केला आहे.

MP Rahul Shewale Press Conference
Mumbai: कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांवर कोट्यवधींची उधळण; ACBकडून चौकशी करण्यासाठी भाजप आमदाराचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला की, भारतात ती महिला ख्रिश्चन आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिम आहे. वकिलाने तक्रार केली त्याने माझ्याकडे सेटलमेंटसाठी पैशांची मागणी केली. यावेळी शेवाळे यांनी दोन वकिलांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच मला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचे गॅंगस्टर दाऊदसोबत संबंध आहेत, हे साधं प्रकरण नाही. पाकिस्तानी फराह सोबत ती कराची ला जाऊन आली असा दावा शेवाळे यांनी केला.

तसेच युवासेना प्रमुख या महिलेला पाठीशी घालत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा दाऊद बरोबर संबंध आहे. त्या महिलेच्या वकिलाने नबाब मलिक यांचे नाव घेतले असाही आरोप शेवाळे यांनी केला. सोबतच ब्लॅकमेल करणाऱ्या पाकिस्तानी महिलेरा युवासेना प्रमुख आणि राष्ट्रवादीची महिला पाठीशी घालत आहे असाही गंभीर आरोप शेवाळेंनी केला. या संपूर्ण प्रकरणाचा NIAच्या माध्यमातून तपास करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com