"भविष्यामध्ये मी आत असेन किंवा बाहेर, याहीपेक्षा..." भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut In ED Custody: पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला आहे.
Sanjay Raut On Saam TV Exclusive
Sanjay Raut On Saam TV ExclusiveSaam TV

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग (ईडी)ने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. यानंतर संजय राऊत यांना ईडीने (ED) ताब्यात घेत ईडी कार्यालयाकडे नेण्यात आलं. ईडी कारवाईत जाण्यापूर्वी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुचक व्यक्त केलं आहे. "भविष्यामध्ये मी आत असेन किंवा बाहेर त्याची मला पर्वा नाही, याहीपेक्षा मी मोठे स्फोट करत राहीन तेव्हा भाजपला कळेन मी काय आहे" असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut Latest News)

हे देखील पाहा -

पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊतांना ताब्यात घेण्याच्या काही मिनिटेआधी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, जी काही कारवाई व्हायची ती होऊ द्या, मी काही घाबरत नाही. राजकीय सूडोपोटी हा खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे, उद्धव ठाकरे माझ्या पाठीशा आहे, शिवसैनिकांचं बळ आहे. संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, देश ओळखतो ते शिवसेनेमुळे. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि सरपटत जात नाही, निधड्या धातीनं उभं राहतो आणि लढतो कुणी काहीही म्हणू द्या. या कारवाईला मी निधड्या छातीनं समोर जातो आणि लढतो.

या कारवाईलासुद्धा मी निधड्या छातीनं समोर जातोय, यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल. या ज्या राजकीय सुडाच्या कारवाय सुरू आहेत, फक्त भाजपविरोधी लोकांवर सुरू आहेत. आमच्यासारखेही काही लोकं आहेत, जे न झुकता न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात. अशा कारवायांच्या भितीनं अनेक लोकं पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात संजय राऊत त्यातले नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही असं संजय राऊत म्हणाले.

माझ्याकडे कोणतेही कागदपत्र सापडलेले नाही. जे काही पत्राचाळ म्हणतायत त्यातला पत्रा गंजलेला आहे की, स्टीलचा आहे हे देखील मला माहीत नाही. ही चाळ कुठे हे मला माहीत नाही. पण, ठरलेलं आहे की शिवसेना मोडायची, तोडायची माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं त्यासाठी करायचा आहे. पण अशाने शिवसेना कमजोर होणार नाही. उलट माझ्या कारवाईतून शिवसेनेला आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे असंही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Saam TV Exclusive
ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरवर दिली मोठी प्रतिक्रिया

तसेच मी एक लॉमेकर आहे, खासदार आहे, मला कायद्याचं महत्व कळतं असं ते म्हणाले. मला कोणतीही माहिती न देता पहाटे ईडी अधिकारी माझ्या घरात घुसले माझ्या मुलीलाही दुसरीकडे नेण्यात आलं, पण आम्ही परिवारासह या लढाईत उतरलो आहे. माझ्यावर दबाव आणला जातोय हे मी उप राष्ट्रपतींना हे सांगितलं आहे. भविष्यामध्ये मी आत असेन किंवा बाहेर त्याची मला पर्वा नाही याहीपेक्षा मी मोठे स्फोट करत राहीन तेव्हा भाजपला कळेन मी आहे. महाराष्ट्राने उठून उभं रहावं असं संजय राऊत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com