Aurangabad Renaming : औरंगाबादच्या नामांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांनी २५ वर्षांपूर्वी...'

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay raut news
Sanjay raut news Saam tv

Sanjay Raut News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरानंतर आता राज्यात श्रेयवादाचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. औरंगाबाद (Aurangbad) आणि उस्मानाबाद नामांतरावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण घोषणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 25 वर्षांपूर्वी केली होती. आता फक्त घोषणा झाली'.

Sanjay raut news
Aurangabad Renaming : फक्त शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, '२०२४ ची आम्ही तयारी सुरू केली आहे. केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासोबत काही भूमिकांवर चर्चा झाली. केजरीवाल 'आप'लाही कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागतो'.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. पूर्वीचे आणि आताच्या देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. राजकारणामध्ये एकमेकांशी बोलत असतो. देवेंद्र फडणवीस सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती ना, आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही किती काळ उपमुख्यमंत्री असाल, सांगता येत नाही. सर्व दिल्लीच्या मर्जीनुसार आहे. सनसनाटीचा आनंद घ्या'.

Sanjay raut news
Aurangabad Renaming : औरंगाबादच्या नामांतरावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'औरंगाजेब अत्याचारी...

धनंगेकरांनी पोटनिवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांचा वाटप करत आहे असा आरोप केला आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मागच्या निवडणुकीत देखील हा प्रकार उघडकीस झालं होतं'.

'सुरक्षितपणे पैशांची वाटप कोण करू शकतं, तर पोलिसांची वाहने. हे पाच वर्षांपूर्वी उघडकीस आलं होतं. ज्यांनी आरोप केला असेल, तर त्यांच्या माहिती आहे. भाजपच्य कालखंडात पैशे वाटपाची उदाहरणे समोर आली आहेत. पोलीस पोलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं आहे. रविंद्र धंगेकर आरोप करताहेत म्हणजे त्यांना पक्की माहिती असणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com