शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे.
Sharad Pawar vs Narendra Modi
Sharad Pawar vs Narendra ModiSaam TV

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. देशातल्या विविध भागांमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar vs Narendra Modi
Viral Video: म्हशीने तरुणीसोबत केलं असं काही; हसून हसून लोटपोट व्हाल!
Sharad Pawar vs Narendra Modi
PM Narendra Modi Birthday: 'या' कलाकाराने PM मोदींना दिल्या, १,२१३ चहाच्या कपांमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा, असं ट्विट खासदार शरद पवार यांनी केले आहे.

१,२१३ चहाच्या कपांमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birth PM Narendra Modi) प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर १,२१३ मातीच्या चहाच्या कपांमधून पंतप्रधान मोदींचे शिल्प बनवले आहे.

कलाकार पटनायक यांनी बनवलेल्या या ५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी त्यांनी सुमारे ५ टन वाळू वापरली आहे. याशिवाय त्यांनी वाळूवर 'हॅपी बर्थडे मोदीजी' असा संदेशही लिहिला आहे.

दरवर्षी पीएम मोदींच्या(Pm Narendra Modi) वाढदिवसाला पटनायक वेगवेगळ्या प्रकारे वाळूची शिल्पे बनवतात. यावर्षी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुदर्शन म्हणाले, 'आम्ही वाळूच्या शिल्पात मातीच्या चहाचे कप वापरून मोदींचा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा प्रवास दाखवला आहे. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना शुभेच्छा देत आहोत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com