Kukadi Water News : कुकडीचं पाणी पेटलं, सुजय विखेंचा राष्ट्रवादीवर निशाणा, शेतक-यांचे बेमुदत उपाेषण सुरुच

शेतक-यांनी रास्ता राेकाे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
Nagar News, kukadi Project, MP Sujay Vikhe Patil
Nagar News, kukadi Project, MP Sujay Vikhe Patilsaam tv

- सुशिल थाेरात

Nagar News : कुकडीच्या पाण्यासाठी एकीकडे शेतक-यांनी बेमुदत उपाेषण सुरु करत माेठं आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर दूसरीकडे खासदार सूजय विखे-पाटील यांनी देखील नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता गप्प का असा सवाल केला आहे. यामुळे आगामी काळात कुकडीच्या पाण्यावरून पुन्हा पुणे (pune) आणि नगर (nagar) जिल्हा असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

(Maharashtra News)

Nagar News, kukadi Project, MP Sujay Vikhe Patil
Nagpur News : 5 लाखांची सुपारी देत मुलीने वडिलांचा विषयच संपवला; पाेलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी विरोध केल्याने कुकडीच आवर्तन लांबीवर पडल्याने नगर जिल्ह्यातील पारनेर , श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. शेतीसाठी २२ मे रोजी आवर्तन सोडणार असल्याचे कालवा सल्लागार समितीने जाहीर केले होते.

Nagar News, kukadi Project, MP Sujay Vikhe Patil
Khed Krushi Utpanna Bazar Samiti News : मोहिते पाटलांचा नकार कळताच अजित पवारांनी भाजपचे मनसुबे उधळून लावले; 'खेड' वर NCP चेच पदाधिकारी

रस्ता रोकोचा इशारा

त्यास पुणे जिल्ह्यातील काही नेते आणि संघटनांनी विरोध केल्याने हे आवर्तन सोडले गेले नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील शेतकरी संतप्त झालेत. कुकडी कालव्यात पाणी सोडावे अन्यथा घारगाव येथील राष्ट्रीय महामार्ग रस्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बेमुदत उपाेषण सुरु

कुकडी कालवण आवर्जून सोडावे यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पाणी (water) प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Nagar News, kukadi Project, MP Sujay Vikhe Patil
Tembhode News : क्रिकेटच्या मैदानातील हॅण्डग्रेनेडमुळे टेंभोडेत चिंता; अफवांवर विश्वास ठेवू नका ! पाेलीसांचे आवाहन

खासदार सुजय विखे आक्रमक

दरम्यान कुकडीच्या पाण्यावरून खासदार सुजय विखे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. मी मागच्या एक वर्षापासून म्हणतोय राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्याचे नेत्यांनी विरोधात लढा उभा करायचा आहे, तेव्हा कोणीच आलं नाही. जे नगरचे राष्ट्रवादीचे लोक या विरोधात आंदोलन करताहेत त्यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे. हे पाणी कोणत्या पक्षाच्या लोकांनी अडवलं त्या पक्षाचे नगर (nagar) जिल्ह्याचे लोक गप्प बसणार का असा सवाल विखे यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com