"वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोगदे तयार केल्यास पर्यावरणाचा आणि पाण्याचा मोठा ऱ्हास होईल"

पुणे महापालिकेने बोगदा उत्खनन करण्याचा निर्णय पुणे शहराच्या विकास आराखड्यात घेतला होता.
Vandana chavan
Vandana chavansaam tv

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या (Traffic issue) सोडविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे दोन बोगदे आणि तळजाई टेकडी येथे एक बोगदा उत्खनन (tunnel work) करण्याचा निर्णय पुणे शहराच्या विकास आराखड्यात घेतला होता. मात्र वेताळ टेकडी आणि तळजाई टेकडी याठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोगदे तयार केल्यास पर्यावरणाचा (Environment) आणि पाण्याचा मोठा ऱ्हास होईल. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana chavan) आणि काही पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

Vandana chavan
वसतिगृह व सांस्कृतिक भवनाचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...; धनंजय मुंडेंचा इशारा

पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्यात आलं, उड्डाणपूल बांधण्यात आले, इलेक्ट्रिसिटी बस आणण्यात आल्या,या तिन्ही गोष्टींमुळे पुणे शहराची वाहतूक कोंडी तीस टक्क्यांनी कमी होईल, असा दावा पुणे महापालिकेनं केला होता.त्यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेताळ टेकडी आणि तळजाई टेकडीमध्ये बोगदा उत्खनन करण्याची काय गरज आहे ? असा सवाल वंदना चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

वेताळ टेकडीवरील भाग हा वनाच्छादित भाग असून हा भाग कोथरूड आणि प्रभात रोड भागातील नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंग बँक आहे. त्याठिकाणी परत बोगदे तयार केल्यास हा रेन वाटर हार्वेस्टिंग बँक आणि वनाच्छादित भाग भविष्यात प्रभावित होईल.असा दावा देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. मुळात पुणे महानगरपालिकने ह्या तिन्ही बोगद्याच फ्री प्रॅक्टिकल प्लान तयार न करता विकास आराखडा मध्ये हे बोगदे दर्शविण्याची चूक पुणे महापालिकेने केली आहे. असाही दावा करण्यात आलाय. त्याचबरोबर पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्प राबवत असताना तो तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे राबविण्यात यावा, साबरमती नदी विकासासारखा तांत्रिक पद्धतीने पुणे शहरातील नद्यांचा सुधार करण्यात येऊ नये, अशी मागणी देखील वंदना चव्हाण यांनी केली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com