Maharashtra Political News: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ? शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv

Vinayak Raut News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

विनायक राऊत म्हणाले, 'मंत्री शंभूराज देसाई यांना काय करायचे आहे ते करू द्या. पण सध्या शिंदे गटातील बऱ्यात आमदारांमध्ये असंतोष आहे. शिंदे गटातील असंतोषाला पहिली वाचा खासदार गजानन कीर्तिकर यांनी फोडली. अनेक आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे'.

Maharashtra Political News
Maharashtra Government Yojana: 1 रुपयात पीकविमा, वर्षाला मिळणार 6 हजार रुपये! राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या योजना

'आमदारांना ५० खोके आणि कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

'काही मंत्री सोडले तर उरलेल्या आमदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अनेकांना फसवणूक झाल्याचे वाटत आहे. अनेकांची परतीचा मार्ग स्वीकारावा लागतोय, अशी भावना आहे. याची सुरुवात खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे, असे राऊत म्हणाले.

Maharashtra Political News
Sachin Tendulkar News: कुस्तीपटूंचे देखील स्माईल अ‍ॅम्बेसेडर व्हाल... नवी जबाबदारी स्विकारताच राष्ट्रवादीचा सचिनला टोला

'शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत. तरीही या आमदारांना 'मातोश्री'चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाही. शिंदे गटाच्या आमदारांबाबत उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाकडून ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून आमदार आणि खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही केला जात आहे. या दावा-प्रतिदाव्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com