
मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्यांनी पुन्हा अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये, माध्यमांना तिखट प्रतिक्रीया देऊ नये असे केल्यास पुन्हा जामीन रद्द होऊ शकतो असंही न्यायालयाने म्हटले आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर केला आहे. १२ दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण करणारच असा इशारा देत अमरावतीमधून मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे मुंबईमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. शिवाय राणा यांच्या वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारी होती असं सांगत त्यांच्यावरती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली होती.
तसंच राणा दाम्पत्याला पोलिस ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी पोलिसांशी देखील हुज्जत घातल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
खासदार नवनीत राणांना जेजे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. राणा यांच्या वकिलांनी त्यांना मणक्याचा त्रास असून त्यांच्या कमरेचे दुखणे वाढले असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. तसंच उपचारासाठी राणा यांना बाहेर नेण्याची परवानगी मिळावी यासाठी राणा यांच्या वकिलांनी भायखळा तुरुंग अधीक्षकांकडे मागणी केली होती. नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये (JJ Hospital) हलविण्यात आलं आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.