एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 2 महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

मागील २ महिन्यांपासून रखडलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आता लवकरच मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 2 महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 2 महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणारSaam Tv

मुंबई : मागील २ महिन्यांपासून रखडलेले एसटी ST कर्मचाऱ्यांचे employees वेतन salary आता लवकरच मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींकरिता ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी घेतला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना Corona संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर income परिणाम होत आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भात उपाय योजनांवर चर्चा झाली आहे. यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ -

चालू आर्थिक वर्षाकरिता १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प तरतुदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला अगोदरच वितरीत केला आहे. उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावे, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला आहे. निधी वितरीत झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास खूप मदत होणार आहे.

कोरोना महामारी मध्ये मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये Lockdown सार्वाजनिक वाहतूक Transportation व्‍यवस्‍था ठप्प झाली होती. यातच कोट्यवधींचे उत्‍पन्न अचानक बंद झाल्‍यामुळे महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. मागील दीड वर्षात बहुतांश वेळा वेतनास विलंब होत असल्‍यामुळे कर्मचाऱ्यांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त होत आहे. एसटीच्या ९७ हजार कर्मचाऱ्यांचे २ महिन्यांचे वेतन झालेच नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता महिन्याला २९० कोटींची आवश्यकता असते.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 2 महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार
Good news for central employees | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आहे खुशखबर, पाहा व्हिडिओ

परंतु, अखेर जुलै महिन्याचे वेतन मिळाले नाही. तसेच, ऑगस्ट महिनाही संपला असून ७ सप्टेंबरला ऑगस्ट महिन्याचे आणखी एक वेतन द्यावे लागणार आहे. यामुळे, एसटी महामंडळाला एकूण ५५०- ६०० कोटींची आवश्यकता असणार होती. त्यानुसार आज ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com