MSRTC NOTICE: एसटी महामंडळाचं टोकाचं पाऊल; 55 हजार कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस...

ST Bus Strike: एसटी महामंडळाने 55 हजार कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावली आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
MSRTC issued notice to ST Bus Workers
MSRTC issued notice to ST Bus WorkersSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. आता काही प्रमाणात एसटी सेवा सुरु झाली असली तरी अद्यापही अनेक कर्मचारी संपावर (Strike) ठाम आहेत. आता याच संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी (ST Bus Workers) कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने (MSRTC) टोकाचं पाऊल उचललं आहे. संप करणाऱ्या या सुमारे ५५ हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अडचणींत वाढ होऊ शकते. (ST Bus Strike Latest News in Marathi)

हे देखील पहा -

एसटी महामंडळाने सेवा समाप्ती केली आहे ते कर्मचारी वगळून उर्वरित कर्मचारी यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार अपराध कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजवली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना या नोटीसींना उत्तर द्यावे लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com