Mulund Accident: कट मारल्याचा जाब विचारल्याने ट्रकने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू; तब्बल २० फूट फरपटत...

Accident News Update: घटनास्थळावरुन पळून गेलेल्या ट्रक चालकावर कलम 302 आणि मोटर वाहन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mulund Accident
Mulund AccidentSaamtv

Mulund Crime News: कारला कट मारल्याचा जाब विचारण्यासाठी गाडी अडवणाऱ्या तरुणाला ट्रकने उडवल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड मध्ये समोर आला आहे. भावेश सोनी या कार चालक तरुणाला जीव गमवाला लागला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेत कार चालक टेम्पो चालकाविरोधातकलम 302 आणि मोटर वाहन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulund Accident
Bombay High Court: 'प्राथमिक शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी...' मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले; काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश सोनी हा युवक त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने कारने प्रवास करत होता. मुलुंड (Mulund) टोल नाक्याच्या आधी पूर्व ध्रुतगदी मार्गावर त्याला एका टेम्पोने कट मारला. टोल नाका क्रॉस केल्यानंतर भावेश आणि त्याच्या नातेवाईकांनी टेम्पोला अडविण्याचा प्रयत्न केला.

यासाठी त्यांनी टेम्पोला ओव्हरटेक करून सर्वजण टेम्पो समोर उभे राहिले आणि टेम्पोचालकाला बाहेर येण्यास सांगितले. परंतु टेम्पो चालकाने गाडी बाहेर न पडताच गाडी थेट त्यांच्या अंगावर घातली. यामध्ये इतरांनी बाजूला होऊन आपला जीव वाचवला, परंतु भावेशला टेम्पो समोरून निघता आलं नाही आणि टेम्पोने त्याला वीस फूट फरपटत नेले. (Latest Marathi News)

Mulund Accident
Pimpri Chinchwad: भोजपुरी अभिनेत्रीची देहविक्री व्‍यापारातून सुटका; व्‍यापार करणारी टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

या घटनेनंतर भावेशला ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले. परंतु उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पो चालक नूर मोहम्मद इब्रार अली शाह याला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर कलम 302 आणि मोटर वाहन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com