Mulund Fire News: मोठा अनर्थ टळला; जीवाची पर्वा न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवले नागरिकांचे जीव

Mulund Fire News: पोलिसांनी जीवाची पर्वा न करता इमारतीतील नागरिकांची सुटका केली.
Mulund Fire
Mulund Fire Saam TV

जयश्री मोरे

Mulund Fire News: मुलुंड स्टेशनबाहेर लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. मुलुंडमधील धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. मुलुंड पोलीस ठाण्याच्या बीड मार्शलच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता इमारतीतील नागरिकांची सुटका केली.

मुलुंडमधील धीरज अपार्टमेंट भीषण आग लागली तेव्हा मुलुंड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र हनुमंत शिंदे, अर्जुन राठोड हे दोघे याच परिसरात होते. आगीची घटनेनंतर परिसरात एक गोंधळ सुरु होता. आग वाढत होती, तर इमारतीत काही जण अडकले होते.

अशावेळी राजेंद्र शिंदे आणि अर्जुन राठोड यांनी जीवांची पर्वा न करता इमारतीत शिरुन काही अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढलं. एका वृद्ध महिलेला अक्षरशः उचलून त्यांनी थेट तळमजल्यापर्यंत आणलं. या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा टळला. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलुंड स्टेशन परिसरातील सहा मजल्याची ही इमारत असून आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार ते सहा गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com