Mumbai AC Local: मुंबई AC लोकल भाडे कमी केल्यानंतर रेल्वेचा आणखी एक मोठा निर्णय

रेल्वेने एसी लोकलच्या तिकीट दरांत कपात केल्यानंतर प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai AC Local: मुंबई AC लोकल भाडे कमी केल्यानंतर रेल्वेचा आणखी एक मोठा निर्णय
Mumbai AC Local Train Latest UpdateSAAM TV

Mumbai AC Local Train News Update : मुंबई उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलचे प्रवासी भाडे कमी केल्यानंतर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा देणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या (Central Railway) मेन लाइनवर एसी लोकल ट्रेन संख्या वाढवण्यात आली आहे. मे महिन्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्या वाढाव्यात अशी मागणी होत होती.

Mumbai AC Local Train Latest Update
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम, जाणून घ्या

५ मेपासून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या (Mumbai Local) प्रवासी तिकीट दरांत मोठी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यानंतर मुख्य मार्गावरील सीएसएमटी-कल्याण-टिटवाळा आणि बदलापूरपर्यंत एसी लोकल वाढवण्यात याव्यात, अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनानं हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल मुख्य मार्गावर वळवल्या असून, फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकल वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सीएसएमटी, कल्याण, टिटवाळा आणि बदलापूर या दरम्यान संख्या वाढून ती ४४ वरून ५६ वर पोहोचली आहे. इतकेच नाही तर रविवारी घोषित केलेल्या ब्लॉक दरम्यान १४ एसी लोकल धावतील. यापूर्वी रविवारी एसी लोकल मुख्य मार्गावरून धावत नव्हत्या.

Mumbai AC Local Train Latest Update
Titwala : सहाय्यक रेल्वे चालकाचं धाडस, पाहा व्हिडीओ | SAAM TV

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, प्रवासी तिकीट भाडे कमी झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यानंतर एसी लोकल वाढवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. ही मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सुविधेत वाढ झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

डाऊन मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचे वेळापत्रक

टिटवाळा लोकल सकाळी ६.३० वाजता

डोंबिवली लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०.२२ वाजता

अंबरनाथ लोकल सीएसएमटी येथून दुपारी १.१५ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता

अंबरनाथ लोकल दादर येथून संध्याकाळी ७.३९ वाजता

ठाणे लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०.२० वाजता

अप मार्गावरील वेळापत्रक

सीएसएमटी लोकल ठाणे येथून सकाळी ५.२४ वाजता

सीएसएमटी लोकल टिटवाळा येथून सकाळी ८.३३ वाजता

सीएसएमटी लोकल डोंबिवली येथून सकाळी ११.४८ वाजता

सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून दुपारी ३.१२ वाजता आणि रात्री ८.५० वाजता

दादर लोकल अंबरनाथ येथून संध्याकाळी ६.३० वाजता

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.