
Mumbai- Ahmedabad Highway Accident: मुंबईत दहिहंडी (Dadhinadi Festival 2023) बघून एकाच दुचाकीवर घरी परतणार्या तीन तरुणांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई अमहदाबाद महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाले आहेत. हे तीनही तरुण विरारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरारच्या (Virar) मनवेलपाडा येथील सिद्धीविनायक चाळीत राहणारे गणेश कामत (२१) यतीन साटम आणि रितेश सिंग हे तीन तरुण गुरूवारी (७, सप्टेंबर) मुंबईला (Mumbai) दहिहंडी बघण्यासाठी गेले होते. संध्याकाळी ते तिघे एकाच दुचाकीवरून घरी परतत होते.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील (Mumbai Ahmedabad Highway) काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाराज धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गणेश कामत (२१) याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांनी दिली आहे. अपघातातील जखमी झालेल्या यतीन साटम याच्यावर ऑर्बिट रुग्णालयात तर रितेश सिंग याच्यावर विरारच्या संजिवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर मनवेल पाडा येथील सिद्धीविनायक निवास चाळ परिसरात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.