मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला (पहा व्हिडिओ)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा जीव्हीकेकडून अदानी समूहाने स्वत:कडे घेतला आहे.
मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला (पहा व्हिडिओ)
मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला (पहा व्हिडिओ)Saam Tv

रामनाथ दवणे

मुंबई - मुंबईचे Mumbai छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ Chhatrapati Shivaji Maharaj Airport ताब्यात येताच अदानी Adani यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद येथे हलवण्यात आले आहे. हे विमानतळ आता 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड'च्या ताब्यात In possession गेले आहे. त्याबरोबर मुंबईमधून एएएचएलचे मुख्यालय हलविण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा जीव्हीकेकडून अदानी समूहाने स्वत:कडे घेतला आहे.

13 जुलै रोजी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. याबरोबर येऊ घातलेल्या व बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा ताबाही आता एएचएलकडे गेला आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले होते.

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला (पहा व्हिडिओ)
सोयाबीन पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यता

पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील हे मुख्यालय आता अहमदाबादला हलवण्यात आले आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आता आणखी एक भर पडणार आहे. अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख ६ विमानतळांचा ताबा असून यामध्ये गुवाहाटी, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मंगळुरु आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांचा समावेश आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com