BIG Breaking : मुंबईच्या वांद्रे परिसरात मोठी दुर्घटना; दुमजली इमारत कोसळली

या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
BIG Breaking : मुंबईच्या वांद्रे परिसरात मोठी दुर्घटना;  दुमजली इमारत कोसळली
Bandra Building AccidentANI Tweeter

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) वांद्रे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे परिसरात मध्यरात्री दोन मजली इमारत कोसळल्याची (Bandra Building Accident) माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mumbai Bandra Building Accident Latest News)

Bandra Building Accident
दुर्देवी घटना! बारावीच्या परीक्षेत पास झालेला निखील आयुष्याच्या परीक्षेत मात्र हरला

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते सध्या सुरक्षित आहेत. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण दबले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, वांद्रे परिसरात इमारत कोसळण्याची घटना काही नवीन नाही. याधीही वांद्रेमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com