
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, त्यापूर्वीच विरोधाची धार अधिक तीव्र झाली आहे. उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं या दौऱ्याला विरोध करून आव्हान दिलं असतानाच, आता मुंबई भाजप प्रवक्त्यांनीही विरोध दर्शवून 'चॅलेंज' दिलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच अयोध्या दौरा करावा, असे भाजप प्रवक्ता संजय ठाकूर यांनी म्हटलं आहे.
भाजपचे (BJP) उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनीही यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता भाजपचे मुंबईतील प्रवक्ता संजय ठाकूर यांनीही अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी आणि त्यानंतरच राज यांनी अयोध्या दौरा करावा, असे ठाकूर म्हणाले.
राज ठाकरे यांनी माफी मागितली तर मी लखनऊ विमानतळावर येऊन शेकडो वाहनांच्या ताफ्यासह त्यांना सुरक्षित आयोध्येत घेऊन जाईल, असेही ठाकूर म्हणाले. पण राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर, विरोध करणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
उत्तर प्रदेशच्या भूमीत पायही ठेवू देणार नाही- बृजभूषण शरण सिंह
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून वाद वाढतच आहे. राज ठाकरेंना 'उंदीर' म्हणणारे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा राग आळवला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन राज ठाकरेंच्या विरोधाचे नियोजन करत आहोत. राज ठाकरे अयोध्याच नाही, तर उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पाय ठेवू शकत नाहीत, असा इशाराही सिंह यांनी दिला.
Edited By - Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.