Mumbai BJP: पटोलेंवर कारवाई करा, भाजपा मुंबईतर्फे साखळी उपोषण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरुन राज्यातील विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे.
Mumbai BJP
Mumbai BJP Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणावरुन राज्यातील विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नाना पटोलेंवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबईतर्फे साखळी उपोषण करण्यात येत आहे (Mumbai BJP On Hunger Strike Lead By Mangal Prabhat Lodha In Protest Of Nana Patole).

Mumbai BJP
Amruta Fadanvis : सूरज को डूबाने निकले नन्हे पटोले ;अमृता फडणवीसांची पटोलेंवर …

यावेळी भाजपा (BJP) मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, भाजपा मुंबई महामंत्री संजय उपाध्याय तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

नेमकं प्रकरण काय?

16 जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जेवणारे येथे प्रचार सभा होती. त्यादरम्यान, आपण मोदीला मारु शकतो आणि शिवीही देऊ शकतो, अशा वक्तव्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर टिकेची एकच झोड उठली. अखेर, नाना पटोले यांनी नमतं घेत स्वतः संबंधित खुलासा केला होता.

दरम्यान, त्यांनी आपण हे संपूर्ण वाक्य मोदी नामक गाव गुंड याला संबोधित केले असून लोकांनी भाजपचा त्याचा विपर्यास केल्याचा आरोप नाना पटोले केला. लोकांनी मला तक्रार केली असल्याने त्यासंदर्भात त्यांना धीर देण्यासाठी मी हे वाक्य बोलले असल्याचा नाना पटोले यांनी खुलासा केला. भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याचा, अर्थाचा, अनर्थ करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Mumbai BJP
Nana Patole: पटोलेंच्या त्या वक्तव्याने भंडाऱ्यात राजकीय वादंग, गावकरी म्हणाले, मोदी नावाच्या गुंडाचं कधी नावंही ऐकलं नाही

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com