Kurla Fire: कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग; धुरामुळे ३९ जण घुसमटले, बचावकार्य सुरू

Mumbai Kurla News: या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Mumbai Kurla  News
Mumbai Kurla NewsSaamtv

Mumbai Kurla Fire:

मुंबईमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मुंंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Mumbai Kurla  News
Junnar Crime: पाळत ठेवून घरात शिरले.. कुटूंबाला मारहाण करत चोरी; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुर्ला परिसरात (Kurla) भीषण आगीची घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर हॉस्पिटलसमोरील १२ मजली इमारतीमध्ये शुक्रवारी (१६, सप्टेंबर) मध्यरात्री आग लागली. या इमारतीत जवळपास ५० ते ६० लोक अडकले होते.

याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांना बाहेर काढले. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. यामुळेच स्थानिकांना त्रास होवू लागला. ३९ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, उपचारानंतर जखमींना घरी सोडण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Mumbai Kurla  News
Sanjay Raut News: 'हे एक डाउटफुल, दोन हाफ सरकार...' मंत्रीमंडळ बैठकीवरुन संजय राऊतांची खोचक टीका

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com