Mumbai Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत ५ व्या आणि ६ व्या मार्गासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे.
mumbai local train
mumbai local train Saam Tv

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत ५ व्या आणि ६ व्या मार्गासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. मेगाब्लॉकमुळे काही एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे लोकल (Local) उशिराने धावतील. ( Mumbai Local Mega Block News Update In Marathi )

mumbai local train
मुंबईत कोरोनाचा विळखा घट्टच, आजच्या आकडेवारीमुळं नागरिकांना दिलासा नाहीच

ब्लॉक कालावधित ठाणे-कल्याण मार्गावरील सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत ५ व्या आणि ६ व्या मार्गावर अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील. या कालावधित 11010 पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 17611 हजूर साहिब नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, 12124 पुणे - मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22160 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस, 12321 हावडा- मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

तसेच 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस आणि 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कल्याण येथे १०-१५ मिनिटे उशिराने पोहोचेल. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ठाणे आणि दिवा दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १०-१५ मिनिटे उशिरा चालेल.

mumbai local train
Mumbai : मुंबईत भाजप कार्यालयावर तृतीय पंथीयांचा मोर्चा ; राहुल गांधींच्या समर्थनार्थ मोर्चा

हार्बर मार्गावरही असेल मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणारी आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल - वाशी या सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com