Covid-19 In Mumbai: मुंबईत १८ दिवसांच्या अंतरानंतर कोरोनामुळे एकाचा मत्यू, एकूण 580 रुग्ण घेतायत उपचार

Covid-19 In Mumbai: मुंबईत कोरोनामुळे शेवटचा मृत्यू हा 13 ऑक्टोबर २०२२ ला झाला होता.
Covid-19 In Mumbai News
Covid-19 In Mumbai NewsSaam TV

Covid-19 Mumbai News: मुंबईमध्ये तब्बल १९ दिवसांच्या अंतरानंतर कोरोना व्हायसरमुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य परिपत्रकानुसार 18 दिवसांच्या अंतरानंतर, मुंबईत काल, मंगळवारी कोविड-19 (Covid-19) या आजारामुळे एकाच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत कोरोनामुळे शेवटचा मृत्यू हा 13 ऑक्टोबर २०२२ ला झाला होता. (Mumbai Latest News)

Covid-19 In Mumbai News
Horoscope Today 2 November 2022: 'या' राशीच्या लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मुंबई महापालिकेच्या (BMC) हेल्थ बुलेटीननुसार कोरोमुळे मृत्यू झालेली ही व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त होती, त्यांचे वय 63 वर्ष इतके होते. कोरोना सध्या आटोक्यात आहे. मुंबईत १३ ऑक्टोबर २०२२ ला कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर आता १८ दिवसांच्या अंतरानंतर कोरोनामुळे मत्यू झाला आहे.

मुंबईत काल, मंगळवारी 83 नवीन कोरोनारुग्ण आढळले आहेत. यासोबतच कोरोनाच्या संसर्गाची एकूण संख्या 11,54,082 वर पोहोचली आणि मृतांची संख्या 19,739 वर पोहोचली आहे. उल्लेखनीय म्हणजे, दैनंदिन कोविड-19 प्रकरणांची संख्या सलग तिसर्‍या दिवशी 100 च्या खाली राहिली. रविवारी आणि सोमवारी महानगरात अनुक्रमे 84 आणि 55 प्रकरणे नोंदवली गेली. (Corona Latest News)

Covid-19 In Mumbai News
Kanika Mann: आज रात्री काय करतायत? कनिकाचे 'हे' फोटोज पाहून अंगावर येतील शहारे

गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गातून 31 रुग्ण बरे झाल्यानंतर शहरात आता 580 सक्रिय प्रकरणे उरली आहेत. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11,33,763 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात एकूण 3,653 स्वॅबचे नमुने तपासण्यात आले असून, शहरात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 1,84,57,465 झाली आहे.

रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.2 टक्के आहे, तर कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर हा 10,229 दिवस आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने आरोग्य परिपत्रकात दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com